Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दोन मुलांची हत्या करून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या ; झिंजेवाडी येथील घटना कर्जत -  तालुक्यातील झिंजेवाडी येथे आई व दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. अंगणवाडीसेविकेने दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर तिने हे कृत्य केले असावे, अशीही चर्चा परिसरात आहे. बुधवार (दि.२१) घडलेल्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
उज्ज्वला संदीप जाधव (वय २४), राजवीर (वय ५), उत्कर्षा (वय ८ महिने, तिघे रा. छिंजेवाडी, ता. कर्जत, जि. अ.नगर) ही मयतांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, जाधव यांच्या राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत अंगणवाडी सेविका उज्ज्वला जाधव हिचा मृतदेह आढळून आला. दोन मुलांचे मृतदेह पलंगावर होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संजय सावंत यांच्यासह कर्जत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात आणले.

Post a Comment

0 Comments