नगर रिपोर्टर
दि.३० आँगस्ट
अहमदनगर - पं.दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था व पं.दीनदयाळ उपाध्याय व्याख्यानमाला समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत माऊली सभागृहात आयोजित केला असल्याची माहिती पं.दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी दिली.
मंगळवार (दि.३) प्रमुख वक्ते आर एस एस अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार हे कश्मिर- कल-आज आणि उद्या याविषयावर बोलणार आहेत. या कार्यक्रमचे उद्घाटक केंद्रीय राज्यमंत्री, लघुद्योग, पशुसंवर्धन दुग्धविकास प्रतापचंद्र सारंगी हे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ. सुजय विखे पा. असणार आहेत. दि.४ रोजी प्रमुख वक्ते पत्रकार भाऊ तोरसेकर हे पुरोगामी झाले प्रतिगामी या विषयावर बोलणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलिस महानिरीक्षक कष्णाप्रकाश असणार आहेत. दि.५ रोजी प्रमुख वक्ते भाजपचे सुनिल देवधर हे एकात्मता मानवता वादातून आधुनिक भारताकडे वाटचाल याविषयावर बोलणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख हे असणार असून यावेळी महिला सबलीकरण बचत गट योजना व मोबाईल बँकिंगचे उद्घाटन होणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. या कार्यक्रमास बँकेचे व्हाईस चेअरमन गौतम दीक्षित, मानस सचिव विकास पाथरकर, संयोजन समिती प्रमुख धनंजय तागडे, कार्यवाह सुहासभाई मुळे, सुधीर पगारिया, सोमनाथ देवळालीकर, नकुल चंदे, डॉ ललिता देशपांडे, श्रीमती शैला चंगेडे, सुभाष फणसे, बाबासाहेब राणसिंग, किरण बनकर, बाळकृष्ण जोशी, अनिल मोहिते, आर डी मंत्री, निलेश लाटे, नरेंद्र श्रोत्री, निलेश लोढा, अनिल सबलोक, मंगेश डांगरे, सुखदेव दरेकर आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments