Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला ना.पंकजा मुंडे यांचे सर्व मागण्या सोडविण्याचे आश्वासननगर रिपोर्टर
सोमवार दि.१९
मुंबई - महाराष्ट्र राज्य  अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधीनी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर महिला व बाल विकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांच्याशी  चर्चे दरम्यान, सर्व मागण्या सोडविण्याचे समितीला आश्वासन दिले.
समितीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकबाकीसह  मानधनवाढ लवकरच दिले जाईल., अर्ध्या मानधना ऐवढी पेन्शन योजनेची मागणी विचाराधीन आहे.
जून जुलै दोन महिन्याचे  थकीत मानधन विना विलंब देण्यात येईल. अंगणवाडी केंद्राचे वाढीव व थकीत भाडे, सर्व थकीत प्रवास भत्ता  दैनिक भत्ता , आदीवासी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिरीक्त पोत्साहन भत्ता, रिक्त जागा भरणे विविध पदे, विमा योजना  पोषण आहार कार्यक्रम मोबाईल प्रोत्साहनपर भत्ता सेविका ५००/- व मदतनिसाना २५०/- भत्ता इत्यादी सर्व मागण्या बाबत सचीवस्तरावर  कृती समितीची बैठक घेवून त्या मागण्या समाधानकारक सोडविण्याचे आश्वासन मंत्री यांनी दिले. या आश्वासनमुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने २२ जुलै पासून सुरु केलेला अहसहकार आंदोलन स्थगित करण्याचे कृती समितीने जाहीर केले.
विभागाचे सहसचिव ला.रा.गुजर,.कक्ष अधिकारी जाधव तर कृती समितीचे काँ एम.ए. पाटील, काँ दिलीप उटाणे,  अँड निशा शिवूरकर, आरमायटी इरानी, भगवान देशमुख, सुवर्णा तळेकार  आदी सह अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
 सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपले नियमित काम सुरु करण्याचे आवाहन अंगणवाडी कर्मचारी  कृती समितीने केले आहे.

Post a Comment

0 Comments