Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन
नगर रिपोर्टर
नवीदिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (66) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. शनिवारी दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यांपासून ते सॉफ्ट टिशू सरकोमा या फुफ्फुसाशी संबंधित कर्करोगाने ग्रस्त होते. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
जेटली यांना सॉफ्ट टिशू सरकोमा या फुफ्फुसाशी संबंधित कर्करोगाने ग्रासले होते. त्यांना मधुमेह देखील होता तसेच त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर ते वरचेवर आजारी पडू लागल्याने डॉक्टरांनी त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यात त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले.

Post a Comment

0 Comments