Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्राध्यापकांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न! पोलिसांकडून प्राध्यापकांवर लाठीहल्लानगर रिपोर्टर
सोमवार दि.२६
मुंबई - मुंबईतील आझाद मैदानावर गत काही दिवसांपासून सुरू असलेले विना अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांवर पोलिसांनी सोमवारी (दि.26) लाठीचार्ज केला. यात ५ प्राध्यापक गंभीर जखमी झाले आहेत.

प्राध्यापकांच्या आंदोलनावर  पोलिसांनी तुफान लाठीहल्ला केला असून, त्यात दहा जण गंभीर जखमी झाले आहे. या प्राध्यापक आंदोलनाची धार कमी करण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. सरकार या प्राध्यापकांच्या मागण्यांवर मार्ग न काढता थेट दडपशाही करत आहे. नगर जिल्ह्यातील प्रा.सुभाष चिंधे, गणेश पूंड, संजय शेवाळे, ज्ञानेश्वर बर्डे, उमादेवी शेळके, कल्पना कुटे, शेखर अंधारे, ऋषिकेश माताडे, देविदास आरवणे, गणेश सप्रे आदीसह श्रीरामपूर, पारनेर, जामखेड, पाथर्डी, राहाता या तालुक्यातील सुमारे पाचशे शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments