Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आरक्षणासाठी वंजारा समाजाचा क्रांतीकारी मोर्चा


आता तरी हातातला कोयता खाली येऊ द्या 
आमच्या लेकराबाळांचा भविष्य घडू द्या,
एकच मिशन वंजारा आरक्षण, मोर्चात हजारोंच्या संख्येने अबालवृद्ध सामील
नगर रिपोर्टर
बीड  - स्व. गोपीनाथ मुंडेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहात महाराष्ट्रात भाजपाला सुगीचे दिवस आणणार्‍या वंजारा समाजाला भाजपाच्या पाठिशी राहुन आज अखेर आपल्या न्याय-हक्काच्या आरक्षण मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाला साथ दिल्यानंतरही वंजारा समाजाच्या हातातले कोयते बाजुला जात नाही, त्यांना घाम गाळावा लागत आहे, काबाडकष्ट करावे लागत आहे, अशा भयावह अवस्थेत भाजप सरकारने आपल्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून आज अखंड वंजारा समाज एकवटला. ‘एकच मिशन, वंजारा आरक्षण’ हा नारा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून समाजातील अबालवृद्धांनी मोर्चा काढला. सरकारविरोधात घोषणाबाजी करत आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं या नार्‍याने आस्मंत दुमदुमून सोडलं. भगवे ध्वज आणि मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जावून धडकले. या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाज बांधव एकवटल्याचे दिसून आले. 

    वंजारा समाज हा वाडी वस्त्यावर रहाणारा आहे वंजारा समाजाची आर्थीक स्थिती अत्यंत कमकुवत असून या समाजाला दरवर्षी ऊसतोडण्याशिवाय पर्याय नसतो. गेल्या तिस ते चाळीस वर्षापासून या समाजाने भाजपाला राजकीय पाठबळ दिलेले आहे. स्व. गोपीनाथ मुंडेंनी वंजारा समाजासह अखंड बहुजन समाजाचा उद्धार करण्याचा विडा उचलला होता आणि ते त्या उद्धारासाठी कामही करत होते. म्हणूनच अवघा वंजारा समाज मुंडेंच्या पाठिशी कालही होता आणि आजही आहे. मुंडेंच्या अकाली निधनाने वंजारा समाजातला देव दुरावला, ही भावना समाजात आहे. ज्या स्व. मुंडेंमुळे भाजपाला आज सुगीचे दिवस आले त्यांनीच मुंडेंचा पाठिराखा करणार्‍या वंजारा समाजालाही भुलवित ठेवले, हा संताप समाजामध्ये दिसून येत आहे. वंजारा समाजामुळे भाजपाला आतापर्यंत फायदाच झाला. स्वतःच्या फायद्यासाठी समाजाने शासनाकडे काहीही मागितले नाही मात्र येणार्‍या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी आणि तरुणांच्या हातातील कोयता खाली पडवा यासाठी वंजारा समाजाला वाढीव आरक्षण दयावे अशी मागणी केली जात आहे. या वाढीव आरक्षणासाठी
जिल्हाभरातील वंजारा समाज रस्त्यावर उतरला. आज दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भव्य मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये हजारो वंजारी बांधवांची उपस्थिती होती. विशेष करुन महिला, मुली, विद्यार्थी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शेतकरी आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अगदी शिस्तबध्द पध्दतीने मोर्चाला सुरूवात झाली होती.

हाती भगवा ध्वज व विविध मागण्याचे फलक मोर्चामध्ये दिसून येत होते. सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, एकच मिशन वंजारा आरक्षण यासह अन्य घोषणांनी आस्मंत दुमदुमून गेलं होतं. सुभाष रोडने हा मोर्चा जेव्हा कलेक्टर कचेरीकडे कुच करत होता तेव्हा सत्ताधार्‍यांच्या उरात धडकी भरावी, असाच जनसैलाब दिसत होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आल्यानंतर महाराजांना अभिवादन करून हा मोर्चा थेट कलेक्टर कचेरीकडे गेला. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येमध्ये अबालवृद्ध उपस्थित होते. महिलांचीही संख्याही लक्षणीय पहायला मिळाली. यावेळी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments