Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

100 रुपयांनी स्वस्त झाला घरगुती गॅस सिलेंडर

नगर रिपोर्टर टिम
सोमवार दि.1 जुलै
नवी दिल्ली- तेल कंपन्यांनी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी विना सबसिडी वाल्या घरगुती एलपीजी सिलेंडरमागे 100.50 रुपये दर कमी केला आहे. 1 जुलैपासून दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर 637 रुपयांत मिळेल. तेल कंपन्यांकडूनच ही माहिती मिळाली आहे.
विना सबसिडी वाल्या घरगुती सिलेंडरचे बाजार मुल्य कमी झाल्याने सब्सिडीयुक्त घरगुती सिलेंडरला रिफील करताना 100.50 रुपये कमी द्यावे लागलील. सब्सिडीयुक्त सिलेंडरच्या वापरकर्त्यांना 1 जुलैपासून रिफिल मिळाल्यानंतर 737.50 रुपयांऐवजी 637 रुपये द्यावे लागतील. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑईल कॉरपोरेशनच्या रविवारी जारी झालेल्या जाहिरातीत ही माहिती समोर आली आहे.
सबसिडीयुक्त घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना रिफिल घेताना जे बाजारमुल्य आहे, तो भरावा लागेल. त्यानंतर सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. एका वर्षांत 12 सिलेंडर सबसिडीवर मिळतात. एलपीजी सिलेंडरच्या कमी झालेल्या किमतीमुळे आता 142.65 रुपये एका सिलेंडर मागे सबसिडी मिळेल. त्यामुळे आता जुलै 2019 मध्ये सिलेंडरची किंमत 494.35 रूपये होईल.

Post a Comment

0 Comments