Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यातंर्गत 8 पो.नि, 11 स.पो.नि आणि 14 पो.उप.नि. अधिकार्‍यांच्या बदल्या
नगर रिपोर्टर टिम
बुधवार दि.10
अहमदनगर -  जिल्ह्यातील 8 पोलिस निरीक्षक, 11 सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि 14 पोलिस उप निरीक्षक अशा एकूण 33 पोलिस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या झाल्या. या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख ईशू सिंधु यांनी दिले आहेत.
 पोलिस निरीक्षकांची नावे व बदल्याच्या ठिकाणे सुनिल पांडुरंग गायकवाड (कर्जत पोलिस ठाणे), राजेंद्र धर्मा चव्हाण (शनिशिंगणापूर पोलिस ठाणे), सुभाष दादा भोये (साई मंदिर सुरक्षा, शिर्डी), गोकुळ रुस्तुमराव औताडे (शिर्डी पोलिस ठाणे), मुकुंद काशिनाथ देशमुख (राहुरी पोलिस ठाणे), हनुमंतराव झुंबरराव गाडे (अकोले पोलिस ठाणे), अनिल बबनराव कटके (वाचक पोलिस ऑफिस, जि.कार्यालय), प्रभाकर भाऊसाहेब पाटील (सायबर पोलिस ठाणे अतिरिक्त कामकाज द.वि.प.अ.नगर)
 सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे व बदली ठिकाणे शंकरसिंग चुनिलाल राजपूत (नगर तालुका पोलिस ठाणे), प्रविण भिला पाटील (भिंगार कॅम्प पोलिस ठाणे), जनार्दन भिकन सोनवणे (सोनई पोलिस ठाणे), प्रकाश अधिकराव पाटील (लोणी पोलिस ठाणे),नितीन सुदाम पाटील (राजूर पोलिस ठाणे), समाधान सुरेश पाटील (श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे), सचिन अशोक बागुल (राहुरी पोलिस ठाणे), दीपक गोविंद गंधाले (शिर्डी पोलिस ठाणे), नितीन दगडू पाटील (संगमनेर शहर पोलिस ठाणे), किरण विठ्ठल सुरसे (कर्जत पोलिस ठाणे), पप्पू यासिन कादरी (कोतवाली पोलिस ठाणे) आदी एकूण 11 जणांच्या बदल्या झाले आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षकांचे नाव व बदलीचे ठिकाण याप्रमाणे भैय्यासाहेब अशोक देशमुख (भिंगार कॅम्प पोलिस ठाणे), राजेश प्रल्हाद घोळवे (बीडीडीएस शिर्डी), विश्वनाथ सदाशिव निमसे (अर्ज शाखा, पो.अ.कार्यालय), चंद्रकांत पांडुरंग कोसे (सुपा पोलिस ठाणे), गिरीश रमेश सोनवणे (कोतवाली पोलिस ठाणे), पंकज नामदेव शिंदे (तोफखाना पोलिस ठाणे), नाना भागचंद सुर्यवंशी (लोणी पोलिस ठाणे), महिला पो.उप निरीक्षक संगिता विलास गिरी (लोणी पोलिस ठाणे), कृष्णा भागिनाथ धायवट (तोफखाना पोलिस ठाणे), लक्ष्मण तुकाराम भोसले (तोफखाना पोलिस ठाणे), दीपक दिनकर ढोमणे (अकोले पोलिस ठाणे), माधव पुंडलिक केदार (संगमनेर शहर पोलिस ठाणे), सुनिल हरिभाऊ सुर्यवंशी (वाचक अ.पो.अ.भाग  कार्यालय,अहमदनगर), महिला पोलिस उप निरीक्षक पूनम अशोक श्रीवास्तव (कोतवाली पोलिस ठाणे) आदी 14 अशा एकूण 33 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिधु यांनी काढले आहेत. 

Post a Comment

0 Comments