Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

छावण्या बंद झाल्याने शेतकरी आक्रमक


नगर रिपोर्टर टिम
सोमवार दि.1 जुलै
अहमदनगर  -  नगर तालुक्यातील छवण्या बंद झाल्या बद्दल शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतकर्‍यांनी नगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून छावण्या बंद केल्याच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
  प्रशासनास सोमवारी (दि.1) दुपरी 4 वाजेपर्यंत अल्टीनेटम निर्णय घेऊन छावण्या चालू करण्याचे आदेश दिले नाही तर सोलापूर रोडवर साकत येथे रास्ता रोको चा इशारा यावेळी शेतकर्‍यांनी दिला आहे. यावेळी जि.प.सदस्य संदेश कार्ले, तालुका प्रमुख राजू भगत, किशोर पवार, संपत वाघमोडे, राजू भगत, चांगदेव शिंदे,  मोहन वाघमोडे, उद्धव शिंदे, दिलीप चितळकर, माणिक शिंदे, राजू कार्ले   आदींसह साकत, नारायणडोह, रुईछत्तीशी, गुणवाडी, हातवळण, वडगाव तांदळी आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सकारात्मक निर्णय अ झाल्याने सर्व शेतकर्यांनी तहसील कार्यालया बाहेर जोरदार घोषणाबाजी करून छावण्या सुरु करण्याची मागणी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments