Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुंबईत जाणार्‍या व येणार्‍या रेल्वे रद्द; अनेक गाड्यांचे मार्गामध्ये बदल

नगर रिपोर्टर टिम
मंगळवार दि.2 जुलै
मुंबई - मुसळधार पावसामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबईत जाणार्‍या व येणार्‍या रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आला आहे. काही गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. काही रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्याने सोलापूर व हैदराबाद मार्गे जाणार्‍या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. रेल्वे रुळांवर साचलेले पाणी आणि मंद वाहतुकीमुळे हा महत्त्वपूर्ण रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिन येथून ही माहिती दिली आहे.
यात प्रामुख्याने मुंबईला जाणार्‍या व येणार्‍या रद्द करण्यात आलेल्या रेल्वे याप्रमाणे- 12115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस जेसीओ, 12116 सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस, 12702 हैदराबाद-मुंबई हुसैन सागर एक्सप्रेस, 17032 हैदराबाद मुंबई एक्सप्रेस, 51030 बीजापूर-मुंबई फास्ट पॅसेंजर
मार्ग बदलविण्यात आलेल्या रेलगाड्या - 1 जुलैला 11014 कोयंबतूर-एलटीटी एक्सप्रेस दौंडवर थांबवण्यात आली. तसेच 2 जुलै रोजी सोलापूर येथून 11013 एलटीटी-कोयंबतूर एक्सप्रेस करण्यात आली आहे. 11302 बंगळुरू-मुंबई एक्सप्रेस सोलापूर येथे थांबवण्यात आली. आता ही ट्रेन 3 जुलैला दौंड येथून 11301 मुंबई-बंगळुरू एक्सप्रेस म्हणून निघणार आहे. 16340 नगरसोल-मुंबई एक्सप्रेस सोलापूर येथे रद्द करण्यात आली. आता ही ट्रेन सोलापूर येथून 16351 मुंबई-नगरसोल होऊन निघणार आहे. 17032 हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस पुण्यात थांबवण्यात आली. ही गाडी आता पुण्याहून 17031 मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस होऊन 2 जुलैला निघत आहे. 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस 1 जुलैला भुसावळ येथे रद्द करण्यात आली. ही गाडी आता भुसावळवरूनच 12139 मुंबई-नागपूर एक्सप्रेस 2 जुलैला बनून निघत आहे.

Post a Comment

0 Comments