Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

टाकळीभान येथे युवकाने स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्यानगर रिपोर्टर टिम
गुरुवार दि.4
अहमदनगर  – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील विवाहित युवक राहुल पवार (वय २७) याने स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. आज सकाळी घडलेल्या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. राहुल यांनी नेमकी का आत्महत्या केली, याचा उलगडा होऊ शकला नाही. परंतु तो पब्जी गेमच्या आहारी गेला होता, अशी चर्चा आहे.
राहुल पवार हे विवाहित आहेत. त्यामुळे नेमकी पब्जी गेममुळेच त्यांनी आत्महत्या केली की दुसरे काही कारण आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. पवार यांनी आज सकाळी अचानक आत्महत्या केल्यामुळे टाकळीभान येथील ग्रामस्थांनी त्यांच्या घरी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.
पवार हे काही दिवसांपासून पब्जी गेमच्या आहारी गेले होते, असे त्यांचे नातेवाईक व मित्रांचे म्हणणे आहे. परंतु विवाहित पुरुषाने पब्जी गेममुळे आत्महत्या केली असेल का, अशी शंकाही उपस्थित केली जाऊ लागली आहे.


Post a Comment

0 Comments