Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

यमुना एक्स्प्रेस वेवर बस नाल्यात कोसळून २९ जण ठारनगर रिपोर्टर टिम
सोमवार दि.8
उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर सोमवारी दि.8 रोजी सकाळीच अपघात झाला आहे. एक प्रवासी बस नाल्यात कोसळली आहे. या दुर्घटनेत २९ जण ठार झाले आहेत. तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक ठिकाणी पोहचलं असून मदतकार्य सुरू  आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. ही बस लखनऊ वरुन दिल्लीला जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला.
मृतांच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेश रोडवेजने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. ही डबल डेकर बस होती, ही बस अवध डेपोची होती. अपघातानंतर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून जखमींना बाहेर काढण्याचे काम केले जाते आहे.

Post a Comment

0 Comments