Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीमध्ये भाविकांना फसविणारे १२ जण अटकेत


नगर रिपोर्टर टिम
सोमवार दि.8
अहमदनगर – शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांना यंत्र दाखवून व्हीआयपी दर्शन करून देतो, अडीच हजार रुपयांमध्ये भक्तनिवासात रूम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसविणाऱ्या 12 जणांना पकडण्यात आले आहे. शिर्डी पोलिसांनी आज मंदिराच्या गेट नंबर एक जवळ ही कारवाई केली.
सागर किशोर ननवरे (वय-29, रा.सावळीविहीर), हनुमान काशीनाथ इखे (वय-27, रा. कालीकानगर), शाकीर शबीर तांबोळी (वय-39, रा.श्रीरामनगर), राजू बालमभाई शेख (वय-41, रा.श्रीरामनगर), प्रकाश पांडूरंग पवार (वय-49, रा.चौधरीशाळा), हरीश सुकदेव गालफाडे (वय-26, रा.ननेरावाडी), सलीम सैयद जाकिर (वय-34, रा.भिमनगर), बळीराम धृवकुमार डुबे (वय-35, रा. इनामवाडी), विजय पावलास गुंजाळ (वय 48, रा. सावळीविहीर), सतिश नानासाहेब शिरसाठ (वय-30, रा. व्दारकानगर), नाना साहेबराव सांळुखे (वय-33, रा. सावळीविहीर), शरद मुरलीधर कांजाळे (वय43, रा. मंचर, पुणे) ही अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पोलिस पथक खाजगी वाहनाने लक्ष्मीनगर येथील नाल्याच्या
पुढे जात असताना काही लोक रस्तावर गाड्यांना हात दाखवून गाड्या पुढे जाण्यास अटकाव करीत होते. त्यामुळे ट्रॉफीक जाम होवून पोलिसांचे खासगी वाहन हे पुढे जाण्यासह अडथळा निर्माण झाला. गाडीला काही इसमांनी हात दाखवून थांबवून पुढे जाण्यास अटकाव केला. वाहनाच्या दोन्ही बाजूने काही
इसम जमा झाले. त्यातील काही लोकांनी हातातील साई यंञदाखवून बोलले की, ‘हे साईबाबा मंदीरात यंत्र दाखवून व्ही.आय.पी दर्शन होते. तसेच काही लोक बोलले की, श्रीसाई भक्तनिवास मध्ये राहण्यास 2 हजार 500 रूपयांत रूम आहे.’ लोक जमा होवून साईबाबाच्या दर्शनासाठी येणारे भाविकांची यंत्र
दाखवून दिशाभुल करून यंत्र घेण्यास अप्रमाकिपणे प्रवृत्त करत होते. कारण असे यंत्र दाखवून कुठल्याही प्रकारचे शिर्डी येथील साईबाबा मंदीरात व्ही.आय.पी दर्शन होत नाही, तरी दर्शनासाठी येणारे भाविकांची दिशाभूल करून फसवणूक करीत होते.भक्त निवासमध्ये राहण्यास रूम देतो, असे म्हणून येणारे लोकाची दिशाभूल करत होते. शिर्डी संस्थाने भाविकांच्या राहण्यासाठी सोय केली आहे. परंतु त्याचे दर इतके जास्त नसताना त्यांची फसवणूक करून स्वत:च्या फायद्यासाठी जास्त पैसे घेवून रूम देतो म्हणून फसवणूक करत असताना 12 जणांना पकडले आहे. त्या सर्वांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments