Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राहुरीत तलाठी ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यातनगर रिपोर्टर टिम
सोमवार दि.8
राहुरी  – सातबारा उतारावर फेरफार नोंद घेण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना कामगार तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला. नाशिकच्या पथकाने राहुरी तालुक्यातील मालुंजा येथे ही कारवाई केली.बाबासाहेब रामजी पंडित (वय-४०, व्यवसाय-कामगार तालाठी मौजे मालुंजा, रा. देवळारी प्रवरा, ता,राहुरी) हे अटक केलेल्या कामगाराच्या तलाठ्याचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, महिलेच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंद घेण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती. सदर रक्कम आज देण्याचे ठरले होते. याबाबत सदर महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाकडे तक्रार केली होती. त्यावरून पोलीस उपअधीक्षक विजय जाधव, पोलीस कर्मचारी प्रकाश डोंगरे, शाम पाटील, विनोद शिंपी आदींच्या पथकाने सापळा रचला. आज रात्री २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कामगार तलाठी बाबासाहेब पंडित याला रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Post a Comment

0 Comments