Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी ; राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलनगर रिपोर्टर टिम
गुरुवार दि.11
राहाता - सुदर्शन या न्यूज चँनलचे पत्रकार जितेंद्र जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहाता पोलीस स्टेशन मध्ये एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुदर्शन न्यूज चे पत्रकार  जितेंद्र जाधव हे नेहमी प्रमाणे आपल्या कार्यालयात  बुधवार दि.१० जुलै रोजी सायंकाळी बसले असता त्यांच्या कार्यालयाशेजारी सार्वजनिक हातपंप आहे. त्या ठिकाणी काही महिलांचे पाणी भरण्या वरून भांडण सुरु होते. ते भांडण सोडवण्याकरिता  जाधव गेले असता, त्या ठिकाणी  रामा गायकवाड या नावाचा मुलगा उभा होता त्या ठिकाणी जितेंद्र जाधव यांना बघून सदरील आरोपी याने मागील काही दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तुझ्या सगट तुझे कुटुंब २ महिन्यात संपवतो, अशी धमकी जितेंद्र जाधव यांना दिली. या प्रकरणी रात्री उशिरा रामा गायकवाड या आरोपी विरोधात खुनाची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments