Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राहुरी तालुक्यातील पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरले

   
नगर रिपोर्टर टिम
शनिवार दि.6 जुलै
राहुरी - पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आज सायंकाळी पाच वाजता 7 हजार 310 क्युसेकने राहुरीच्या मुळा धरणाकडे नव्या पाण्याचा प्रवास सुरू झाला आहे.
हरिश्चंद्र गडाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने शनिवारी दि.6 जुलैला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास 600 दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असलेले पिंपळगाव खांड धरण आज शनीवारी दुपारी पुर्ण क्षमतेने भरले आहे. पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाल्याने दुपारी 3 वाजता 1513 क्युसेकने मुळा धरणाकडे पाणी सुरू झाले होते. तर सायंकाळी 5 वाजता या पाण्याची वाढ 7 हजार 310 क्युसेकने झाली.


हरिश्चंद्र गडाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस तसेच आज सायंकाळची पाण्याची आवक कायम राहिल्यास रविवारी रात्री पर्यंत मुळा धरणात नवीन पाणी दाखल होण्यास मदत होणार आहे. मुळा धरणात आज शनीवारी सायंकाळी 4 हजार 712 दशलक्ष घनफुट पाणी साठ्याची नोंद झाली होती. मुळा धरणाचा 4 हजार 500 दशलक्ष घनफुट हा मृतसाठा असल्याने 212 दशलक्ष घनफुट पाणी वापरासाठी राहिले आहे. 
मुळा धरणावर अवलंबून असलेल्या 10 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी शिल्लक असलेले पाणी महिनाभर पुरणार आहे.

Post a Comment

0 Comments