Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रीरामपूर येथे पिस्तुलाच्या धाकाने ७५ लाख लुटले नगर रिपोर्टर टिम
मंगळवार दि.9
श्रीरामपूर – पिस्तूल, तलवारीचा धाक दाखवून 75 रूपयांची रोख रक्कम लुटण्यात आली. श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यांमध्ये सचिन उदावंत, राहुल उदावंत (दोघे रा. राहुरी), सर्वेश प्रजापती (रा. जळगाव), शैलेश ऊर्फ विकी भंडारी (धुळे), बिट्टू वायकर (रा. श्रीरामपूर), दादासाहेब जाटे (रा. गळनिंब), राजेश शिंदे (रा. संगमनेर) व आणखी सहा ते सात अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी येथील सचिन उदावंत व राहुल उदावंत हे कापसाचे व्यापारी श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील चांगदेव अंबादास पवार यांच्या संपर्कात होते. व्यापाराच्या माध्यमातून त्यांच्यात अनेक वर्षांपासून व्यवहार झाले होते. पवार यांचा उदावंत बंधूंवर विश्वास होता. नोटांच्या बदल्यात सुटे पैसे दिले, तर उदावंत बंधूना १६ टक्के कमिशन मिळणार होते. त्यासाठी ते पवार यांना पैसे मागत होते.

पवार यांनी त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली व बँकेतून ७५ लाख रुपये काढले. ते पैसे उदावंत यांच्याकडे दिले. पवारही त्यांच्याबरोबर गेले होते. ते एमआयडीसी येथे पैसे बदलून देण्यासाठी आल्यावर अचानक १० ते १२ जण तेथे आले. त्यांनी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून सचिन उदावंत यांना मारहाणही केली. मात्र तो बनाव असल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. त्यानंतर दोन बॅगमध्ये ठेवलेले पैसे चोरटे घेऊन पळून गेले.

पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments