Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पतीच्या खूनप्रकरणी पत्नी व मेहुण्यास सक्तमजुरीची शिक्षा


नगर रिपोर्टर टिम
गुरुवार दि.11
अहमदनगर - लाकडी दांडका डोक्यात घालून पतीची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने पत्नी व मेहुण्यास दोषी ठरवले. जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिलारे यांनी दोन्ही आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दिपाली मारुती शिंदे व श्रीकांत आजिनाथ ससाने अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी दिपाली शिंदे व मयत मारुती शिंदे हे दोघे कौटुंबीक वादामुळे विभक्त राहत होते. आरोपी दिपाली ही श्रीगोंदा येथे राहत असून कौशल्याबाई नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल श्रीगोंदा येथे काम करते. 22 डिसेंबर 2016 रोजी मारुती शिंदे हा दिपाली काम करीत असलेल्या शाळेत गेला आणि दोघांमध्ये कडाडून भांडण झाले. यावेळी दिपालीने भाऊ श्रीकांत व शशिकांत यांना फोन करून बोलावून घेतले. यानंतर दिपाली, श्रीकांत व शशिकांत यांनी मारुती यास शाळेजवळून लांब नेत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीमध्ये मारुती याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. अखेर उपचारादरम्यान त्याचे 25 डिसेंबर 2016 रोजी निधन झाले.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कुमार सोने यांनी पूर्ण केला आरोपींविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. दोन्ही पक्षांतर्फे 15 साक्षीदार तपासण्यात आल्यानंतर न्यायालयाने आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Post a Comment

0 Comments