Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरात शिक्षकांची रस्त्यावर धुमाचक्री


 

नगर रिपोर्टर टिम
मंगळवार दि.9
अहमदनगर-  जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या आज होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीवरून शिक्षकांमध्ये चांगलाच वादंग निर्माण झाला. विशेष म्हणजे संचालकाला दमदाटी करून धक्काबुक्की करण्याचा प्रकार भररस्त्यावर घडला.
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड आज होणार आहे. या निवडीपूर्वी बँकेचे संचालक हे सभागृह जात असतानाच त्यांना अनेक सदस्यांनी अटकाव केला. काही जणांनी संचालकांनी आतमध्ये जाऊ नये अशी भूमिका घेतली होती. मात्र दुसऱ्या गटाकडून संचालकांना आत मध्ये नेण्यासाठी मोठी धडपड सुरू होती. त्यातच रस्त्यामध्ये नगर नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या आज होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीवरून शिक्षकांमध्ये चांगलाच वादंग निर्माण झाला विशेष म्हणजे संचालकाला दमदाटी करून धक्काबुक्की करण्याचा प्रकार भररस्त्यावर घडल्यामुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments