Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरात मोकाट कुत्र्यांचा बालकावर हल्ला


नगर रिपोर्टर टिम
अहमदनगर- शहरातील भिस्तबाग चौक येथे व कोहिनूर मंगल कार्यालयासमोरील वसाहतीत आयुक्तांच्या घराजवळ मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अकरा वर्षीय मुलीसह एक चार वर्षांचा बालक जखमी झाला आहे. सुमारे तासाभराच्या कालावधीतच या दोन्ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोहिनूर मंगल कार्यालयासमोरील नंदनवन कॉलनीत घडलेल्या घटनेत दोन-तीन मोकाट कुत्र्यांनी एका चार वर्षीय बालकावर हल्ला चढविल्याचे सांगण्यात आले. अवधूत गायकवाड असे या बालकाचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच नंदनवन कॉलनीत मनपा आयुक्तांचेही निवासस्थान असून, त्याजवळच ही घटना घडल्यामुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमी बालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. दुसरी घटना भिस्तबाग चौकात घडली असून, यात एका पाळीव कुत्र्याने एका अकरा वर्षीय मुलीवर हल्ला केल्याने ती जखमी झाली आहे. दुर्गा पिंपळे असे या मुलीचे नाव आहे.

Post a Comment

0 Comments