नगर रिपोर्टर टिम
गुरुवार दि.11
अहमदनगर - पैसे घेतानाच्या ‘व्हायरल व्हिडिओ’मुळे तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नंदकुमार सांगळे याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी काल रात्री ही कारवाई केली.
सांगळे हे वाहतूक शाखेत असताना त्यांनी एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते. सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेऊन सांगळे याची सखोल चौकशी केली त्यानंतर नंदकुमार सांगळे यांच्यावर निलंबनाची कारवाईचे आदेश बजाविण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी पदभार स्वीकारल्यापासून पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडली आहे. गैरप्रकार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्या पोलिस अधिकाऱ्यांबाबत तक्रारी होतात, त्यांच्यावरही कारवाईची भूमिका घेतली आहे.
0 Comments