कार्यकारिणीत सहा उपाध्यक्ष, पाच सहचिटणीस, 14 सदस्य व 8 विशेष निमंत्रित
नगर रिपोर्टर टिम
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांची निवड आज जाहीर करण्यात आली. तर सहचिटनीस पदी अहमदनगर घडामोडीचे निवासी संपादक बाबा जाधव यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड दोन वर्षांसाठी आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी कार्यकारिणी जाहीर केली असून, त्यात 6 उपाध्यक्ष, 5 सहचिटणीस, 14 कार्यकारिणी सदस्य आणि आठ विशेष निमंत्रित सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे.
संघाचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः अध्यक्ष ः सुभाष गुंदेचा, सरचिटणीस : ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील, खजिनदार : सुधीर मेहता, उपाध्यक्ष : अशोक खांबेकर, ऍड. बाळासाहेब आगे, गणेश जेवरे, सोपानराव दरंदले, रियाज फजलोद्दीन शेख व प्रकाश भंडारे.
सहचिटणीस : महेंद्र कुलकर्णी, दत्ता इंगळे, सुखदेव फुलारी, नासीर पठाण व बाबा जाधव. कार्यकारिणी सदस्य : संजय वाघमारे, बाळकृष्ण पुरोहित, किसन हासे, राजेश सटाणकर, ज्ञानेश दुधाडे, पद्माकर शिंपी, सय्यद निसार, अशोक झोटिंग, शकूर शेख, अविनाश मंत्री, मीना मुनोत, नवनाथ दिघे, अमीन शेख व दामोदर वैद्य. विशेष निमंत्रित सदस्य : विठ्ठल लांडगे, अनिल गर्जे, आबीदखान दुलेखान, अन्वर खान, किशोर आखाडे, धनराज गांधी, प्रफुल्ल मुथा व किशोर कालडा.
0 Comments