Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी साहेबराव अनाप; उपाध्यक्षपदी बाळासाहेब मुखेकरनगर रिपोर्टर टिम
मंगळवार दि.9
अहमदनगर -  प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने सत्ताधारी गुरुमाऊली मंडळामध्ये फूट पडली. यामुळे मंडळाचे नेते रावसाहेब रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे सर्व संचालक निवडून आले होते, असे असताना अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने संचालकांनी विरोधात गेले. यात बापू तांबे, आबासाहेब जगताप व रावसाहेब सुंबे यांनी केले. बँकेच्या अध्यक्षपदी बंडखोर गटाचे साहेबराव अनाप (राहुरी) यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब मुखेकर (अकोले) यांची निवड झाली. बंडखोर गटाच्या ताब्यात ११ तर रोहोकले समर्थकांकडे ९ संचालकांनी पाठिंबा देत आपले मत नोंदविले.
साडेतीन वर्षापूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीत रावसाहेब रोहोकले यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळाचे सर्व संचालक निवडून आले होते. रोहोकले यांच्या एकहाती कारभारातून बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली तसेच बँकेची आर्थिक स्थिती सुधारली. अनेक धाडसी निर्णय घेताना कर्जमर्यादा वाढवून देताना कर्जावरील व्याजदर देखील कमी केला गेला.
दरम्यान, रावसाहेब रोहोकले हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि संचालक म्हणूनही ते नियमानुसार निवृत्त झाले. यानंतर उपाध्यक्षांनी काही काळ कारभार पाहिला आणि नंतर त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची आज सभा बोलविण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर हे होते.
अध्यक्षपदासाठी रोहोकले समर्थक संचालकांकडून अविनाश निंभोरे (श्रीगोंदा) व सौ. मंजुषा नरवडे (नगर) यांनी अनुक्रमे अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. बंडखोर गटाकडून साहेबराव अनाप (राहुरी) यांनी अध्यक्षपदासाठी तर बाळासाहेब मुखेकर (अकोले) यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.
पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने संचालक मंडळात फूड पडली असल्याचे रोहोकले यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमातच स्पष्ट झाले होते. या कार्यक्रमानंतर लागलीच काही संचालक गायब झाले. त्यावेळी बंड होत असल्याची कुणकूण लागली होती.
दरम्यान, आज सकाळी पदाधिकरी निवडीसाठी संचालक बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच मंडळाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बंडखोर गटाच्या संचालकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामुळे काही वेळ वातावरण तापले होते. प्रचंड घोषणाबाजीत संचालकांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर पदाधिकारी निवडीसाठीची सभा झाली आणि त्यात पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments