Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आयकॉन स्कूलचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे महापालिकेचे आदेश


 नगर रिपोर्टर टिम
शनिवार दि.6
अहमदनगर - शहरातील शरद मुथ्था एज्युकेशन ट्रस्टच्या आयकॉन स्कूलचे बेकायदा करण्यात आलेले बांधकाम पाडण्याचे आदेश महापालिका उपायुक्त प्रदीप पठारे यांनी बजावले आहेत. वाहनतळ व टेरेसच्या मोकळ्या जागेसह संरक्षक भींतीचे बांधकाम विनापरवाना आहे. ते १५ दिवसांत ते काढून घ्यावेत, अन्यथा महापालिका प्रशासनाकडून पाडण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी शुक्रवारी (दि.५) आदेशाची प्रत संबंधित संस्थेला देण्यात आल्या अअसल्याचे सांगितले आहे.
मल्हार चौकातील सर्वे नंबर ४६/२ मधील तळ मजल्यावर पार्किंगच्या जागेत ११७७ चौरस मीटर जादा बांधकाम, समोरील व मागील सामास अंतरात १२ चौरस मीटर जादा बांधकाम करण्यात आले आहे. तसेच तिसर्‍या मजल्यावर ओपन टेरेस दर्शविलेल्या जागेत ५५६ चौरस मीटर जादा बांधकाम करण्यात आले आहे. समोरील बाजूस मैदानाच्या कडेने अनधिकृत पत्र्याच्या शेडचे बांधकाम, शाळेच्या मागील बाजूस १५ मीटर विकास योजनेच्या रस्त्यामध्ये संरक्षक भींतीचे बांधकाम करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
मुथ्था एज्युकेशन ट्रस्टच्या मंगल शरद मुथ्था व प्रमिला अशोक मुथ्था (रा.माणिकनगर, अहमदनगर) यांना वेळोवेळी सुनावणी घेऊन संधी देऊनही त्यांनी बांधकाम नियमित केल्याबाबतची कागदपत्रे सादर न केल्यामुळे नगररचना विभागाच्या अभिप्रायानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त पठारे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, अतिक्रमित संरक्षक भींत काढून घेण्याचे काम शाळेकडून सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments