Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर येथे बॉम्बच्या स्फोटात दोघे ठार



नगर रिपोर्टर टिम
बुधवार दि.10
अहमदनगर - शहराजवळील के के रेंज येथील खारेकर्जुने परिसरात बॉम्बचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आकाश गायकवाड व संदिप धिरवडे अशी दोघांची नावे आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
खारेकर्जुने येथील केके रेंजच्या प्रवेश परवानगी नसणा-या परिसरात भंगार गोळा करण्यासाठी काही जण गेले असता मंगळवारी (दि.९) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. लष्करी सरावावेळी न फुटलेला बॉम्ब फुटून भंगार गोळा करणाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

Post a Comment

0 Comments