Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्नीचा खून केल्या प्रकरणी पतीला जन्मठेप


नगर रिपोर्टर टिम
शुक्रवार दि.5
अहमदनगर  – पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती कैलास आनंदा नरके (रा. कासारी ता. शिरुर जि.पुणे) याला दोषी असल्या कारणाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जगताप यांनी शुक्रवारी दि.5 रोजी हा निकाल दिला.
याबाबत माहिती अशी की, १०/५/२०१७ रोजी दुपारी ०२.३० वा चे सुमारास चिखली गावचे शिवारात नगर ते दौंड जाणारे रोडवरील शिवनदीचे पुलाजवळ रोडवर कैलास नरके याचे दुस-या महिले बरोबर असलेले अनैतिक शारीरीक संबंधास त्याची पत्नी सविता कैलास नरके (वय-३५ वर्ष रा. कासारी ता. शिरुर) ही त्याचे नेहमी विरोध करते, या कारणावरुन त्याने त्याची पत्नी सविता हिस ट्रक मधून घेवुन जावुन ट्रक मध्ये तीचा सुताचे दोरीने गळा आवळून जीवे ठार मारुन खून केला. पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने तिचे प्रेत रोडचे शिवनदीचे पुलावरुन खाली टाकुन पुरावा नष्ट केला होता. न्यायालयाने यातील आरोपी कैलास आनंदा नरके यास भादंवि कलम ३०२ प्रमाणे जन्मठेप व रुपये ५०००/- दंडाची तसेच भादवि क. २०१ नुसार दोन वर्ष सक्तमजुरी व रुपये १०००/- दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोसई हिवरकर यांनी केला अाहे. सरकारी पक्षाचे बाजूने श्री. ए.बी.पवार, सरकारी वकील, सत्र न्यायालय, अहमदनगर यांनी काम पाहिले आहे. पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ १०२९ बी. बी. बांदल यांनी मदत केली आहे.

Post a Comment

0 Comments