Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अश्‍लील’ फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी खंडणीची मागणी


नगर रिपोर्टर टिम
अहमदनगर - मैत्री करून तरुणीवर शारीरिक अत्याचार केला. लग्नानंतर तिच्यासोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या पतीला खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.केडगाव परिसरातील शास्त्रीनगर येथे ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रितेश सुधाकर शिंदे (रा.शास्त्रीनगर, केडगाव, सध्या रा. दुबई) याच्याविरुद्ध कोतवली पोलिस ठाण्यात खंडणी, बलात्कार आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, शिंदे याचे केडगावमधील एका तरुणीसोबत मैत्री झाली होती. त्याने डिसेंबर २०१८ रोजी तिच्या कायनेटीक चौक परिसरातील लॉजवर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केला. बदनामीच्या भीतीने तिने पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास टाळले. तिच्यासोबत रितेश शिंदे याने मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवले होते.
जून २०१९ मध्ये तिने नगर तालुक्यातील एका युवकासोबत लग्न झाले. लग्नानंतर शिंदे याने तिच्या पतीला व्हॉट्‌स अपवरून दोघांच्या प्रेमसंबंधाचे फोटो टाकले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
सततच्या त्रासास कंटाळून व लग्नानंतरही त्रास सुरू झाल्याने सदर नवविवाहित तरुणीने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments