Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यातील प्रत्येक गरीबाला घरकुल मिळणार – खा. डॉ. विखे
नगर रिपोर्टर टिम
शनिवार दि.6
अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील प्रत्येकाला घरकुल देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पत भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे गृहनिर्माण खात्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकारच्या गृह निर्माण योजना सक्षमपणे राबवून नगर जिल्ह्यातील प्रत्येक गरीबास घरकुल देणाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन नगर दक्षिणचे नवनियुक्त खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. नगर महानगरपालिका अंतर्गत पंतप्रधान आवास योजनाचे घरकुल सोडतीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकला पिण्याचे स्वच्छ पाणी, घर आणि शौचालय देण्याचा संकल्प केला होता, त्यापैकी गॅस आणि शौचालय संकल्प जवळ जवळ पूर्ण झाला आहे. आता 2022 पर्यंत प्रत्येकला घर देण्यासाठी युद्ध पातळीवर केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अर्थ संकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून ह्या योजना ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. त्याच बरोबर राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या नेतूत्वाखाली विविध योजनांची अतिशय प्रभावी अमलबजावणी केली आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असलेली गृहनिर्माण खात्याची जवाबदारी त्यामुळे येणाऱ्या काळात नगर जिल्ह्यातील प्रत्येक गरिबाला निश्चितच आपले हक्काचे घर मिळेल, असे डॉ सुजय विखे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी घरकुल न मिळाल्यास नाराज न होता पुन्हा अर्ज करण्याचे आवाहन केले व कुठल्याही अमिशला बळी न पडण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, आयुक्त, उपायुक्त, कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments