Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून १८ लाख ९२ हजार लंपास

 
नगर रिपोर्टर टिम
मंगळवार दि.2 जुलै
अहमदनगर  – शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड करून तब्बल 18 लाख 92 हजार 500 रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे सहाय्यक महाप्रबंधकांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बँकेच्या एटीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड करून मोठी रक्कम लांबवण्याचा प्रकार उघडकीस आल्याने बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 5 एप्रिल ते 22 मे 2019 दरम्यान जीपीओ चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या परिसरात ही घटना घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एटीएम नंबर CFNA 0000303052 हे एटीएम मशीने स्टेट बँकेच्या आवारात उजव्या बाजूला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी एटीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण करून वेळोवेळी व्यवहार केला. 18 लाख 92 लाख 500 रुपये काढून काही अज्ञात व्यक्तींनी स्टेट बँकेची फसवणूक केली आहे. तसेच बँकेच्या ऑनलाईन तक्रार वेबसाईटवर जावून (CMS) पैसे न मिळाल्याबदल तक्रार करून बँकेकडे नुकमान भरपाई होत होते.
फसवणुकीचा हा फंडा लक्षात येतात बँकेच्या सहाय्यक महाप्रबंधकांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बेंडकोळी हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments