Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कार चोरी करणारी टोळी जेरबंदनगर रिपोर्टर टिम
बुधवार दि.10
श्रीगोंदा – गाड्या चोरून त्या नंबर बदलून वापरणाऱ्या टोळीतील दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. लिंपणगाव येथील हे तरुण पुण्यात नोकरीला होते. अजिनाथ नवनाथ कुरुमकर (रा.मुंढेकरवाडी,ता.श्रीगोंद) व महेश मुरूमकर (रा. निमगाव ता. श्रीगोंदा) अशी अटक केलेल्यांंची नावे आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पो. नि. दौलतराव जाधव यांनी याकामी तपास पथक नेमले. शोध पथकाचे पो.उप.नि. सोमनाथ कर्णवर, पोलीस कर्मचारी अंकुश ढवळे पोकॉ, दादासाहेब टाके, किरण बोराडे, उत्तम राऊत, आदित्य बेलेकर यांनी संशयित अजिनाथ नवनाथ कुरुमकर यास तळेगाव दाभाडे येथून अटक केली. त्याच्याकडे याप्रकारणी चौकशी केली असता, त्याने गुह्याची कबुली दिली. शिवाय त्याचा मित्र याचे साथीने हा गुन्हा केल्याचे अजिनाथने पोलिसांना सांगितले.
मुंढेकरवाडी येथून महेश कुरुमकर यास पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडील मुद्देमाल फिर्यादीचा लॅपटॉप, मोबाईल, एटीम, आधारकार्ड व पाकीट आणि पैसे अंगझडतीतून मिळून आल्याचे श्रीगोंदयाचे पो. नि. जाधव यांनी माध्यमांना दिलेल्या माहिती नमूद केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून टाटा झेस्टा कार (एम.एच.१२ एन ई ३४४४), ४५०००/- रुपये किंमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप, ७०००/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन, २०००/- रुपये रोख रक्कम व आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसन असा एकूण ७,५३,०००/- किमतीचा व वर्णनाचा गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांना मिळून आला आहे.

Post a Comment

0 Comments