जि.प.अंतर्गत कर्मचार्यांच्या दीर्घ कालावधीपासून प्रलंबित मागण्याबाबत
नगर रिपोर्टर टिम
मंगळवार दि.2 जुलै
अहमदनगर- जिल्हा परिषद अंतर्गत काम करणार्या कर्मचार्यांची दिर्घ कालावधी पासून शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे मंगळवार (दि.2) दुपारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे 4340 विविध मागण्याच्या संदर्भाने राज्य शासनाकडे राज्य शाखेने केलेल्या चर्चेनुसार व अनेकवेळा निवेदन देऊनसुध्दा जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत शासन कोणतीच कार्यवाही करत नसल्याने जिल्हा परिषद कर्मचा-यांमध्ये असंतोषाची भावना आहे. जिल्हा परिषद कर्मचार्यांंच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार (दि.2) दुपारी 2 ते 2.30 या कालावाधीमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले.
या अंदोलनात जिल्हा परिषद कर्मचारी युनियन 4 हजार 340 चे जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे सर्व सभासद कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष सुभाष कराळे, राज्य समन्वयक मल्हारी कचरे, जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, जिल्हा सचिव किशोर शिंदे,लेखा संघटनेचे यशवंत सालके, राधेश्याम सपकाळे, प्रसिद्धी प्रमुख सुहास गोबरे, हेमंत कुलकर्णी, राजु जरे, शशिकांत रासकर, सुमित चवहाण, सागर भंडारी, सोमनाथ भिटे, सचिन कोतकर, कैलास झुंगे, सुखदेव महाडीक, कल्पना झोडगे, रजनी जाधव, श्रीमती डोंगरे, कांता जाधव, पुनम उदावंत, वैशाली कासार, छाया बांदल, उमाकांत भांड, संतोष लंके, सारंग पठारे, संदिप तुळेकर, मंगेश मुळे, योगेश गवांदे, राजेंद्र गायकवाड, अनुप गायकवाड, यशवंत बेंद्रे, प्रविण खेडकर, कैलास शेळके, ठोंबरे, श्रीकांत भोईटे, पी.के.देशपांडे, राहुल साळवे, अनिल येनगुंल, इत्यादी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments