Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जामखेड तहसीलदारांची गाडी रामभरोसे.. नगर रिपोर्टर टिम
गुरुवार दि.11
जामखेड - तालुक्याचे दंडाधिकारी तहसीलदार विशाल नाईकवडे यांना संपूर्ण तालुक्याचा दौरा करावा लागतो. अनेक वेळा नैसर्गिक परिस्थितीत अचानक कोणत्याही गावात जावे लागते. अवैध वाळू, मुरूम उपसा थोपवण्यासाठी अचानक धाडी टाकाव्या लागतात पंरतु तहसीलदारांची गाडी नेहमीच नादुरुस्त असते कधी चालू करण्यासाठी धक्का तर बंद पडल्यावर टोचन करून आणावी लागल्याने महसूल यंत्रणे रामभरोसे असलेल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्यावर चार चाकी गाडी बंद अवस्थेत टोचन करूण नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तहसीलदार तालुका दौरा कसा करणार, अशी अवस्था झाली आहे. जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायत व ८७ महसुली गावे आहेत. या गावांचा दौरा करण्यासाठी आपत्ती काळात कधी कधी दोनशे कि. मी. अंतरावर जावे लागते. सध्या तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा मोहरी तलावातुन करण्यात येतो. अचानक काही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर कसे जायचे, हा प्रश्न तहसीलदार यांच्या समोर उभा राहिला आहे.
गेल्या एक वर्षांपासून ही गाडी सारखी दुरूस्त करावी लागते. प्रत्येक वेळी मोठ्य़ा प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चात नवी गाडी आली असती. अनेक वेळा गाडी बदलून मिळण्याची मागणी केली होती परंतु गाडी मिळाली नाही.

Post a Comment

0 Comments