Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हैद्राबाद विमानतळावर स्मगलिंगचे साडेसहा किलो सोने जप्त

भिंगारचे सुपुत्र रोहित जोशी यांची कौतुकास्पद कामगिरी
नगर रिपोर्टर टिम
  हैद्राबाद - शहरालगतच्या    भिंगार येथील सुपुत्र व सध्या हैद्राबाद येथे शासनाच्या कस्टम खात्यात डेप्युटी कमिशनर कस्टम्स म्हणून कार्यरत असलेल्या श्री. रोहित प्रकाश जोशी यांनी दिनांक २ जुलै २०१९  राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे केलेल्या धडक कारवाईमध्ये १४ भारतीय प्रवाशांकडून स्मगलिंग केले जाणारे साडेसहा किलो सोने जप्त करण्याची कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.
सौदीअरब मधून हैद्राबाद येथे आलेल्या विमानातील प्रवाशांची  तपासणी करताना ही धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईचे वृत्त भिंगारमध्ये येताच जोशी कुटूंबियांसह रोहितच्या वर्गमित्रांनी आनंद व्यक्त करत रोहितशी संपर्क साधून अभिनंदन केले.
          श्री. रोहित जोशी यांनी याअगोदर राजीव गांधी एअरपोर्ट येथे ३.९६ करोड व  ९८ लाख रुपये किंमतीचे परदेशी चलन जप्त करण्याची कारवाई केली होती. श्री. रोहित जोशी यांनी कस्टम खात्यात रूजू झाल्यापासून निस्सीम देशभक्तीच्या भावनेतून असंख्य  धडाकेबाज कारवाया केलेल्या असल्याने हैद्राबाद शहरामध्ये त्यांची एक दबंग अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली  आहे.
       श्री.  रोहित जोशी हे मूळचे भिंगार येथील नागरदेवळे भागातील सावतानगरचे रहिवासी आहेत. इयत्ता दहावीपर्यंतचे त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार हायस्कूलमध्ये झालेले आहे. तसेच  उच्च माध्यमिक शिक्षण  नगरमधील रेसिडेन्सीयल जुनियर कॉलेज येथे झालेले आहे.  त्यानंतर त्यांनी पुणे येथील पुणे विद्यार्थी गृह या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंग केले.             
         श्री. रोहित जोशी यांना बालपणापासूनच शासकीय सेवेची आवड होती. घरातच त्यांना वडिलांकडून देशभक्तीचे बाळकडू मिळालेले होते. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर लगेच दिल्ली गाठून यूपीएससी ची तयारी सुरू केली. सन २०१३ सालच्या युपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन ते आय. आर. एस. अधिकारी झाले.
        हैद्राबादमध्ये त्यांनी नुकत्याच केलेल्या कारवाईबद्दल
धनंजय वराडे, सुमित विभुते, नितीन नाशिककर, आशुतोष फळे, सौरभ ठोंबरे यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

1 Comments