Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

साऊथ इंडिया शुगर अँड शुगरकेन टेक्नॉलॉजीस्ट असो.च्या, चेन्नई वार्षिक सर्वसाधारण सभेस ऋषिकेश ढाकणे सहभागी
नगर रिपोर्टर टिम
सोमवार दि.1 जुलै
पाथर्डी - दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या अशा साऊथ इंडिया शुगर अँड शुगरकेन टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनच्या (सिस्टा) चेन्नई येथील वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व युवा नेते ऋषिकेश प्रताप ढाकणे यांना विशेष सहभागी करण्यात आले होते.
       संघटनेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती.भारतात केवळ एकमेव अशी ही साखर कारखानदारांची संघटना असून त्या माध्यमातून केवळ कारखानदारच नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवनवे संशोधन करून त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.यासंदर्भात बोलतांना ढाकणे म्हणाले की,दक्षिणेतील तामिळनाडू,कर्नाटक,आंध्रप्रदेश व तेलंगणा या चार राज्यातील सर्व साखर कारखान्यांची सिस्टा ही संघटना आहे.देशातील सर्वात जुनी अशी ही संघटना असून पुढील वर्षी संघटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.यावर्षीच्या वार्षिक सभेसाठी केदारेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून या परिषदेत सहभागी होता आले.या साखर परिषदेत साखर कारखान्यासंदर्भातील अडचणी,ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि भविष्यातील त्यावरील उपाययोजना यासंदर्भात चर्चा होऊन त्यावर वाटचाल करण्यात येते.सभेचे उदघाटन तामिळनाडू राज्यातील साखर आयुक्त रिटा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संघटनेचे एस.सुरेश व देशातील प्रख्यात अशा गायत्री शुगरचे टी. सरिता रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच ऋषिकेश ढाकणे यांच्या बरोबर केदारेश्वर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे हे देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments