Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यात चलनातून बाद १९ लाख ३६ हजार जप्त


नगर रिपोर्टर टिम
सोमवार दि.1
अहमदनगर  – चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या तब्बल 19 लाख 36 हजार रुपयांच्या नोटा श्रीरामपूर शहरात पकडण्यात आल्या आहेत. अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी महेश मारुती डेगले (वय 43, रा. सरस्वती कॉलनी, देवकर वस्ती, वॉर्ड नं.6, श्रीरामपूर) यास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, अपर पोलिस अधीक्षक पवार यांचा फोन आला होता की, एक इसम चलनातून बाद झालेल्या जुन्या 500 व 1000 रुपये दराच्या नोटा थत्ते ग्राउंडजवळील अशोक पार्क, श्रीरामपूर येथे येणार आहे. त्यावरून पवार यांनी पोलिस कर्मचारी लोंढे व नरवडे यांनी जावून खात्री करा, असा फोनवरुन तोंडी आदेश दिला. त्यावरून थत्ते ग्राऊंड जवळील अशोक पार्क येथे आज दोन पंचाना बोलावून घेतले. तेथे जाऊन पाहणी केली असता एक पांढ-या रंगाचा टी शर्ट घातलेला व विटकरी रंगाचा बरमुडा घातलेला एक इसम हातात कापडी पिशवी घेवुन थत्ते ग्राऊंडकडे पायी चालेला दिसला. तेव्हा आम्ही त्यास थांबण्यास सांगितले. त्याच्याकडील पिशवीची पाहणी केली असता एका कागदी बॉक्समध्ये चलनातील बाद झालेल्या 500 रुपये दराच्या नोटाचे 20 बंडल व 1000 रुपये दराच्या नोटांचे 10 बंडल मिळून आले. त्याच्याकडून 19 लाख 36 हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा नेमक्या कुठून आणण्यात आल्या होत्या, याचा तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments