Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेस सुरुवात

        शासकीय यंत्रणांसह शाळा-महाविद्यालये आणि संस्थांचा पुढाकार
नगर रिपोर्टर टिम
सोमवार दि.1 जुलै
अहमदनगर  - तेहतीस कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध शासकीय कार्यालये, विविध संस्था-संघटना, शाळा-महाविद्यालयांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर निवास परिसरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वृक्षारोपण केले.
राज्य शासनाचा महत्वाकांक्षी  उपक्रम असलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेस आज राज्यात सुरुवात झाली. अहमदनगर जिल्ह्यात आज नगरनिवास येथे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय अधिकारी किर्ती जमदाडे-कोकाटे, सहायक उपवनसंरक्षक एस. आर. पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, उदय किसवे, जयश्री माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, वासुदेव साळुंके, तहसीलदार सुधीर पाटील, हेमा बडे, श्री. घोरपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर. थेटे, श्री. निमसे, श्री. माळी यांच्यासह नेचर वॉलेट आणि फेथ फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.
विविध मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. तेहतीस कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्याला  १ कोटी १८ लाख ८६ हजार उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. यात जिल्हापरिषदेला ४१ लाख ९८ हजार, वनविभागास ४० लाख १३ हजार, सामाजिक वनीकरण विभागास २२ लाख ६६ हजार  आणि इतर यंत्रणांनी १४ लाख ८ हजार असे वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. ही मोहीम ३० सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार असून प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments