Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळीविहीर येथे पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत


जि.प.शाळेस शिक्षणप्रेमींकडून एलडी भेटसावळीविहीर -  राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु॥ यएथील जिल्हा परिषद शाळेत नवीन लहान मुलांचा प्रवेशोत्सव पार पडला. इयत्ता 1 लीत नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट व मोफत पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या दरम्यान, देशभक्तीपर गीते, शालेय घोषणा, वाद्यांसह मुलाचा मराठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आव्हान केले.
  दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. यावेळी सरपंच सौ. रुपाली आगलावे, उपसरपंच सौ. वृषाली जपे यांनी मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राहाता कृषी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे पा. यांनी मुलांना व शाळेतील उपक्रम व गुणवत्तेबद्दल गौरवद्गार काढले. लोकसहभागातून शाळेस 32 इंच दोन एलडी मिळाले. त्या ग्रामस्थांचे पंचायत समितीचे सदस्य ओमेश जपे पा. यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमास संतोष आगलावे, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजू आगलावे, पत्रकार राजु दुनबळे, शाळा कमिटीचे अध्यक्ष दिनेश अरणे आदींसह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी केले. पंकज दर्शने यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मंगला दहिफळे, प्रमिला चौधरी, विद्या गोर्डे, रुपाली मंद्रे, सुचित्रा चवाले आदींनी परिश्रम घेतले.   

Post a Comment

0 Comments