Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कुरिअर फोडण्यामध्ये व्यवस्थापकासह एकजण निष्पन्न


 पारनेर  पोलिसांकडून दोघा चोरट्यांना केले अटक 

पारनेर -  येथील ईकॉम एक्सपे्रेस प्रा. लि. कुरिअर सर्व्हिस बंद कार्यालयाचे शटर उचकाटून रोख रक्कम अन्य वस्तू चोरून नेणारे दोघे अटक करण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहेत. व्यवस्थापक किरण भास्कर कदम व प्रशांत शिंदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  ईकॉम एक्सप्रेस प्रा.लि.या कुरिअर सर्व्हिस कार्यालयाचे बंद शटर उचकाटून आत प्रवेश करून रोख रक्कम अन्य नंबरच्या व किंमतीच्या वस्तू संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता चोरून नेले आहे. हे सर्व तक्रारदार व फिर्यादी ईकॉमचे व्यवस्थापक भास्कर कदम व प्रशांत शिंदे यांनीच केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून विविध कंपनीचे पाच मोबाईल अंदाजे 75 हजार रुपयांचे, एक लेडीज ड्रेस, इलेक्ट्रिक शेगडी 5 हजार रुपये व 47 हजार 500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कलवानिया, पो.नि.बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई बोत्रे, पदमणे, पोना विनोद बोरगे, पोकाँ. शिवाजी कावडे, महेश आव्हाड व अपर पोलिस अधीक्षक यांच्या पथकातील पोकाँ. राठोड, शिंदे, मपोकाँ.माडेकर, काळे आदींनी ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.उप.नि.बी.यु.पदमणे व पोकाँ. वैद्य हे करीत आहेत.   

Post a Comment

0 Comments