Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फेसबुकवर लाईव्ह करत असताना कार अपघात ; दोन ठार
नागपूर- सोशल मीडियाचा अतिरेक होत असल्याचे उदाहरण अनेक  घटना पुढे येत आहेत. नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबूक लाईव्ह  करण्याच्या नादात दोन भावांना जीव गमवावा लागला तर, अन्य 7 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अपघात 16 जून रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात झाला. पुंकेश पाटील कार चालवत होता, तर त्याचा भाऊ संकेत पाटील मोबाईलवरून फेसबूक लाईव्ह करत होता. चालत्या कारमध्ये फेसबूक लाईव्ह करत असतानाच दुसर्‍या गाडीला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याच्या नादात हा अपघात झाला. या अपघातात पुंकेश पाटील आणि त्याचा भाऊ संकेतचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. पुंकेशच्या फेसबूक अकाऊंटवरुन हे फेसबूक लाईव्ह सुरू होते. काही महिन्यांपूर्वी वेणा डॅममध्ये फेसबूक लाईव्ह करताना नाव पलटली होती. त्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारे रामा डॅममध्येही सेल्फीच्या नादात अपघात झाला आणि तरुणांचा जीव गेला होता.

Post a Comment

0 Comments