Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंमलबजावणीची फक्त ग्रामसेवकांवर सक्ती नकोकामावर बहिष्कार टाकण्याचा ग्रामसेवक युनियनचा इशारा
अहमदनगर : सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी संयुक्तपणे राबविणे आवशक आहे. याबाबत स्पष्ट शासन निर्णय असताना राज्यात सध्या या योजनेच्या अंमलबजावणीवरून फक्त ग्रामसेवकांनाच टार्गेट केले जात आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी शासन निर्णयाशी विसंगत भूमिका घेवून ग्रामसेवकांना योजना अंमलबजावणीची सक्ती करीत असून प्रसंगी कारवाई करण्याची धमकीही देत आहेत. या प्रकारामुळे ग्रामसेवक संवर्ग प्रचंड तणावाखाली आला असून महसूल विभागाच्या दडपशाहीमुळे ग्रामविकास विभागाची मूळ कामे बाजूला जात आहेत. याबाबत तात्काळ बैठक घेवून मार्ग काढावा अन्यथा ग्रामसेवक या कामकाजावर बहिष्कार टाकतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 चे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिला आहे.
याबाबत राज्याच्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेल्या निवेदनात ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे व सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी म्हटले आहे की, ग्रामसेवक संवर्गाकडे केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजना, अभियाने, प्रकल्प, दुष्काळ निवारण, मनरेगाची कामे पुरविणे, वृक्ष लागवड, ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज पाहणे अशी अनेक कामे आहेत. त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचीही सक्ती केली जात आहे. सदर शासन निर्णयात ग्रामसेवकांची भूमिका फक्त सहाय्यकाची असताना महसूल विभागाने अन्यायकारक पध्दतीने ग्रामसेवक संवर्गास स्वतंत्र आदेश काढून 70 टक्के कामे दिली आहेत. ती राष्ट्रीय काम म्हणून ग्रामसेवकांनी केली आहे. मात्र काही ठिकाणी कामे अर्पूण राहिल्यास फक्त ग्रामसेवकास जबाबदार धरुन प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे. या योजनेचे लेखे, लाभार्थी पात्र, अपात्र निकष पूर्तता आदी बाबी गावपातळीवर महसूल खाते, तलाठी यांच्याकडे आहेत. याकडे डोळेझाक करीत जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी, तहसीलदार ग्रामसेवकांना सक्ती करीत आहे. राष्ट्रीय काम म्हणून शेतकर्यांसाठी या कामात संयुक्त जबाबदारीने काम करण्याचे ग्रामसेवकांनी मान्य केलेले आहे. तरीही फक्त ग्रामसेवकांनाच टार्गेट करणे सुरु आहे. वरील बाबींचा विचार करता या योजनेचे काम वैयक्तिक रित्या न करण्याचा करण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनने घेतला आहे. यासंदर्भात संबंधित विभागाच्या सचिव व युनियन प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेवून मार्ग काढावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments