Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पांडुळे कुटुंबियांची पालकमंत्री प्रा. ना. राम शिंदे यांनी घेतली भेट

शासनाकडून मदत मिळवून देण्याची दिली ग्वाही

कर्जत-तालुक्यातील घुमरी येथील शेततळ्यात अनिता शरद पांडुळे या विवाहितेसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दुर्दैवी  घटनेतील कुटुंबियांची पालकमंत्री प्रा.ना. राम शिंदे यांनी भेट सांत्वन केले. ना. शिंदे यांनी पांडुळे कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची आश्वासन दिले.  यावेळी चेअरमन नामदेव पांडुळे व कुटुंबियांकडे घडलेल्या घटनेची माहिती ना.प्रा. शिंदे यांनी घेतली.
यावेळी जिल्हा रोजगार हमी योजना समितीचे सहअध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी अनभुले, डॉ.रमेश झरकर, बाजार समितीचे संचालक संपत बावडकर, प.स.सदस्य बाबासाहेब गांगडेॅ, आनंदराव गांगडेॅ, शहराध्यक्ष कैलास बोरूडे, ज्ञानदेव पांडुळे, पोपट अनभुले, काशिनाथ अनभुले, अनिल पांडुळे, सचिन अनभुले, कैलास अनभुले, विठ्ठल अनभुले आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments