Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्जत- कोरेगाव गणाच्या पोटनिवडणूकीसाठी रविवार मतदान


कर्जत -  कोरेगाव गणाच्या पोट निवडणुकीसाठी रविवार, दि २३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोरेगाव गणाच्या पोटनिवडणुकीत एकूण २५ मतदान केंद्रावर मतदान अधिकारी आणि कर्मचारी शनिवारी दुपारी नियोजित ठिकाणी रवाना करण्यात आली असल्याची माहिती सहयक निवडणूक निर्णय अधिकारी छगन वाघ आणि नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी दिली.
         तिसऱ्या अपत्य कारणाने न्यायालयाच्या निर्णयानुसार अपात्र ठरविण्यात आल्याने कोरेगाव गणाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. कोरेगाव गणातील पंचायत समितीच्या एका जागेसाठी ३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनीषा दिलीप जाधव, भाजपाकडून शशिकला हनुमान शेळके तर अपक्ष म्हणून शीतल श्रुषिकेश धांडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे सदर उमेदवारांना अवघे दोनच दिवस प्रचारासाठी मिळाले होते. त्यामुळे सदर निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. कोरेगाव गणासाठी रविवार, दि २३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याकरीता महसूल प्रशासनाद्वारे तयारी करण्यात आली.  कोरेगाव गणाच्या पोटनिवडणुकीसाठी २५ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचारी मतदान यंत्र आणि उपयुक्त साधन सामुग्रीसह नियोजित ठिकाणी रवाना करण्यात आली. कोरेगाव गणासाठी २१ हजार १०७ मतदार हक्क बजावणार असून यामध्ये ११ हजार २३३ पुरुष मतदार तर ९ हजार ८७४ स्त्री मतदार यांचा समावेश आहे. सदर पोटनिवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती कर्जत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
      कोरेगाव गण हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हक्काचा मतदारसंघ आहे तर भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर व जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांच्या जिल्हा परिषद गटातील गण आहे. त्यामुळे या लढतीकडे कर्जत तालुक्याचे विशेष लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षाकडून तुल्यबळ उमेदवार समोरासमोर उभे ठाकले असून अपक्ष म्हणून शीतल धांडे यांनी आपली उमेदवारी कायम राखत चुरस वाढविली आहे. कोरेगाव गणासाठी तिरंगी लढत होत असून आगामी विधानसभेच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments