Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्जत- कोरेगाव गण पोटनिवडणूकीसाठी सरासरी 58 टक्के मतदान

कर्जत: तिसर्‍या अपत्याच्या कारणाने रिक्त झालेल्या कोरेगाव पंचायत समिती जागेच्या पोटनिवडणुकसाठी सरासरी 58 टक्के मतदान झाले. सर्वच ठिकाणी शांततेत मतदान पार पडले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी छगन वाघ, नायब तहसीलदार मनोज भोसेकर आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली.
 कोरेगाव गणाच्या पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी 3 उमेदवार रिंगणात नशीब आजमावत होते. सोमवारी (दि.24) सकाळी 10 वाजता कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे.
तिसर्‍या अपत्याच्या कारणाने न्यायालयाच्या निर्देशानुसार अपात्र ठरल्याने कोरेगाव गणाची पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्या अनुषंगाने रविवार, दि 23 रोजी कोरेगाव गणाच्या पोटनिवडणूक जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. कोरेगाव गणासाठी एकूण 25 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली असून यासाठी सरासरी 58 % मतदान झाले आहे. सकाळपासूनच सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत राबविण्यात आली असल्याची माहिती महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. कोरेगाव गणाच्या एका जागेसाठी 3 उमेदवार आपले नशीब निवडणूक रिंगणात आजमावत होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनीषा दिलीप जाधव, भाजपाकडून शशिकला हनुमान शेळके तर अपक्ष म्हणून शीतल श्रुषिकेश धांडे यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली होती. यासर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रियाकरीता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली. सोमवार दि 24 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी प्रकिया होणार असून दुपारी 12 पर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी कोरेगाव गणामध्ये भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपा ही जागा कायम राखते का ? हे पाहणे रंजक ठरणार आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टीने कोरेगाव गणाचा निकाल राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण ठरणार आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न असून या जागेसाठी राष्ट्रवादीकडून चुरशीची लढत पहावयास मिळाली आहे. तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जि प सदस्य सुनीता खेडकर यांच्या जिल्हा परिषद गटातील निवडणूक असल्याने खेडकर यांच्यासाठी सुद्धा विजय महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे कोरेगाव गणाच्या निकालावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांचे राजकीय वजन अवलंबून राहणार आहे.

Post a Comment

0 Comments