Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार


नवीदिल्ली- दिल्लीतील वसुंधरा एन्क्लेव्ह परिसरात महिला पत्रकार मिताली चंदोला यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मिताली नोएडामध्ये राहतात. त्या शनिवारी रात्री 12.30 वाजता आपल्या हुंडाई आय 20 कारने जात होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या मारुती स्विफ्ट कारमधील  हल्लेखोरांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात एक गोळी त्यांच्या हाताला लागली. त्या तेथून पळ काढत असताना हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर अंडेही फेकून मारले. सध्या मिताली यांना धर्मशिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांना संशय आहे की, कारवर अंडे फेकून लुटमार करणार्‍या टोळीचे हे काम आहे. या सोबतच मिताली यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचे कुटुंबीयांसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे पोलिस त्या अँगलनेही विचार करत आहेत. अशा प्रकारचीच घटना 2008 मध्येही यापूर्वी झाली आहे. पत्रकार सौम्या विश्वनाथन यांना रात्री हल्लेखोरांनी गोळी मारली होती.

Post a Comment

0 Comments