Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिलेवर घरात घुसून सत्तुरने वार, मुलांच्या खेळण्यावरुन वाद

बारामती- . येथील एका महिलेवर सत्तूराने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लोखोर  अरबाज उर्फ अबू कुरेशीला बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
बारामती शहरातील खाटीक गल्लीत लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला होता. त्यामुळे आरोपी अरबाजने तांदळवाडी येथे राहत असलेल्या जबीन गुलाब कुरेशी या महिलेच्या घरात शिरून मानेवर, तोंडावर आणि हातावर सतुराने वार केले. यात महिला गंभीररित्या जखमी झाली असून या महिलेला पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बारामतीत चारच दिवसांपूर्वी मटका व्यावसायिक कृष्णा जाधव यांच्या खूनप्रकरणातील आरोपी चिमी उर्फ वैष्णवी अशोक जाधव हिच्यावर खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वैष्णवी जाधवचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments