Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

५व्या जागतिक योग दिना निमित्ताने वाडिया पार्क, अहमदनगर येथे योग-शिबिराचे आयोजन

अहमदनगर- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज ५व्या जागतिक योग दिना निमित्ताने वाडिया पार्क, अहमदनगर येथे योग-शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने कार्यक्रमास पणन व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांनी उपस्थित राहून योगासने केली, आपणही या दिवसाच्या निमित्ताने रोज सकाळी योगा करावा व आपले शरीर निरोगी ठेवावे असा संदेश ही त्यांनी या वेळी नागरिकांना दिला. या प्रसंगी योग-शिबिरास त्यांच्यासह महापौर श्री. बाबासाहेब वाळके, उपमहापौर सौ.मालनताई ढोणे, माजी खासदार श्री.दिलीप गांधी, जिल्हाधिकारी श्री.राहुल द्विवेदी,पोलिस अधीक्षक श्री.ईशु सिंधु,श्री.पोपटराव पवार तसेच विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments