Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घारगावात शेततळ्यात बुडून मायलेकिंचा मृत्यूश्रीगोंदा- श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील शेत तळ्यात पाणी काढताना  पडून कमल बापू पानसरे वय 36,व त्यांची मुलगी वर्षा बापू पानसरे वय 16 या माय लेकिंचा शेत तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की घारगाव येथील घोटवी रोड वर बापू बाळासाहेब पानसरे यांची शेतजमीन असून त्यात शेतीला पाणी देण्यासाठी मोठे शेत तळे बनविले आहे .आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कमल बापू पानसरे व त्यांची मुलगी वर्षा बापू पानसरे या दोघी मायलेकी गुरे आणि शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी शेत तळ्यावर गेल्या असता पाणी काढताना  पाय घसरून तळ्यात पडल्या . दोघीपैकी एक पहिल्यादा  पाय घसरून शेत तळ्यात पडली असावी आणि वाचवण्यासाठी उडी मारल्याने एकीचा मृत्यु झाला असावा . शेत तळ्यात सुमारे १५-२० फूट खोल पाणी असल्याने व त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या ठिकाणी कोणीही नसल्यामुळे त्यांना कोणीही वाचवू शकले नाही. त्या घरी लवकर न आल्याने  कमल यांचे सासरे बाळासाहेब पानसरे हे त्यांना पाहण्यासाठी शेततळ्या वर गेले असता त्यांना शेततळ्यात मायलेकी पडल्याचे समजले मग त्यांनी आरडा ओरडा करत शेजाऱ्यांना बोलावून घेतले. याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये खबर देण्यात येऊन मयलेकिंचे मृतदेह बाहेर काढण्यात येऊन श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्या करण्यासाठी पाठविले.
  .वर्षा पानसरे हिला नुक त्याच झालेल्या एस एस सी परीक्षेत ती ७५ टक्के गुण मिळवून पास झाली होती. परंतु तिचे पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.मयलेकिंच्या मृत्यू ने संपूर्ण घार गाव आणि परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments