Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ येथील पावसाने खचला पूल, अपघात होण्याची शक्यता!

पूलासह रस्त्याची तातडीन दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी


चिंचपूर पांगुळ येथील पावसाने खचला पूल, अपघात होण्याची शक्यता !
पाथर्डी  - चिंचपूर पांगुळ ते जागेवाडी दरम्यान, रस्त्यावर असणारा पूल शनिवारी (दि.22) झालेल्या जोराच्या पावसाच्या पाण्यामुळे जागीच खचला आहे. या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता नाकारात येत नाही. प्रशासनाने तातडीने या पूलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी चिंचपूर पांगुळ, जागेवाडी, वडगाव ढाकणवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
  पहिल्याच पावसामध्ये पूल खचल्याने यापूर्वी झालेली कामेही अनगोेंदी झाली असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याने नेहमीच मोठ्या प्रमाणात रहदारी असते. रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांना अथवा दुचाकीस्वारास खचलेल्या पूलाचा अंदाज न आल्यास या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या अपघाताची घटना घडण्यापूर्वीच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तिन्ही गावाच्या सरपंचांनी या परिस्थितीकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजेत, तिन्ही गावांच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या परिसरात पाऊस झाल्याने शेतकरी आनंद व्यक्त करीत असेल, पण  चिंचपूर पांगुळ, वडगाव, ढाकणवाडी या परिसरातील रस्त्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. ही अवस्था अनेक वर्षापासून असतानाही, याकडे यापूर्वीचे अथवा आत्ताच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी जाणुनबुजूनच या परिसरातील रस्त्याच्या दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोपी अपवाद नागरिकांनी केला आहे.
 चिंचपूर पांगुळ ते वडगाव या रस्त्यादरम्यान, वामनभाऊनगर जवळील खड्ड्यात पाऊसाचे पाणी साचले जाते. या खड्ड्यातून दुचाकी अथवा शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.  

Post a Comment

0 Comments