Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वांबोरी चारी टप्पा दोन 80कोटी मंजूर पाथर्डी -  तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणार्‍या वांबोरी चारी टप्पा दोनसाठी 80 कोटी रूपये मंजूर झाले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लवकरच भूमिपुजन होणार असल्याची माहीती आमदार शिवाजी कर्डीले यांनी दिली.
  मांडवे (ता.पाथर्डी) येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत दीड कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुरूपोत्तम आठरे होते. पंचायत समिती सदस्य सुनिल परदेशी, एकनाथ आटकर उपस्थित होते.
  कर्डीले म्हणाले की, भविष्यातील पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन राहुरी मतदारसंघातील 70 टक्के गावे मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये घेतली आहे. यापुढे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.पंतप्रधान सडक योजनेमुळे प्रत्येक गावागावात रस्ते झाले आहे. यापुढील काळात वाडीवस्त्यांवरील रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. छावणी चालकांचे देणे विधानसभेत मांडला. त्यामुळे आता छावणी चालकांना तातडीने बिले मिळणार आहे. पशूधन वाचविणार्‍या छावणी चालकांचा सत्कार होणे गरजेचे असल्याचे त्यांना यावेळी आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर लवांडे यांनी केले. उपसरपंच विठ्ठल निर्मळ यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments