Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर माध्यमिक शिक्षकेतर कर्मचार्‍यांची धरणे आंदोलन

                       
पुणे -  राज्य माध्यमिक शिक्षकेतर महामंडळाने आंदोलन करून मिळवलेले हक्क शासन येथे करून काढून घेण्याचे काम करत आहे गेली पंधरा वर्षे शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नेमणुका नाही अर्धवट आकृतिबंधाची घोषणा चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या शिवाय शाळा कशा चालवायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे शासन निर्णय होऊन तीन महिने झाले तरीही आज अखेर संच निश्चिती व भरती झालेली नाही. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी गेली पंधरा वर्षे तणावाखाली काम करत आहे कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर निर्णय मिळवण्यासाठी शिक्षकेतर महामंडळाच्यावतीने काल सोमवारी 24 जून रोजी आयुक्त शिक्षण व शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे सकाळी अकरा वाजता एक दिवसाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन देण्यात आल्याचे राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी दिली।                                                                         याप्रसंगी राज्यातील अनेक शिक्षकेतर कर्मचारी व संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण क्षेत्राच्या शासन विरोधी धोरणाबाबत कडाडून टीका केली                                                                        याबाबत सरकार्यवाह श्री  खांडेकर यावेळी म्हणाले की राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या जवळपास अकरा मागण्या प्रलंबित आहेत या मागणीबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत नाही त्यामुळे आता यापुढे राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी स्वस्थ बसणार नाही, असे सांगून श्री खांडेकर यांनी खालील मागण्या शासन स्तरावर मांडले आहेत.               
 आंदोलनस्थळी शिक्षण आयुक्त दिनकर पाटील यांनी शिक्षकेतरांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन स्वीकारले शासनाला आपल्या भावना तात्काळ कळवू असे आश्वासन शिक्षण आयुक्त  दिनकर पाटील यांनी यावेळी शिक्षकेतर महामंडळाच्या पदाधिकार्‍यांना दिले याप्रसंगी राज्यातील शिक्षकेतरांना आपले धरणे आंदोलन मागे घेतले             
 व्यासपीठावर अध्यक्ष एस डी डोंगरे कार्याध्यक्ष अविनाश चढ गुल वार गोपाळ पेंडकर प्रियांका मुनगेकर आरती कुंभार भागवत पवळे खैरुद्दिन सय्यद प्रमोद पाटील शशिकांत तांबे रवींद्र जाधव बाबासाहेब पाटील अहमद निसार अनील दरेकर केशव पाटील उमेश शेंडे सुखदेव कंद संजय पाटील अहमदनगर चे प्रतिनिधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाराजी मोरे सचिव भानुदास दळवी पद्माकर गोसावी नंदकुमार कुरुमकर जयराम धांडे रामभाऊ मचे पै नाना डोंगरे भाऊसाहेब थोटे आदींसह राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments